देशात गव्हासह पिठाच्या दारात मोठी वाढ !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २७ जानेवारी २०२३ ।  देशात तयार होणाऱ्या गव्हाच्या किंमतीबरोबर पिठाच्या किंमतीतही मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. पिठाच्या किंमतीत 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर गव्हाच्या किंमतीत 14 टक्क्यांची वाढ झाली आहे. गव्हाच्या पिठाची किंमत 34 ते 45 रुपये प्रतिकिलो आहे. तर देशाच्या विविध भागांत गव्हाच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे. सध्या बाजारत गहू 3 हजार 200 ते 3 हजार 300 रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं खुल्या बाजारात 30 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं गव्हाच्या किंमतीत आणि पिठाच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे.

अन्नधान्याच्या किंमती नियंत्रीत ठेवण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने पावले उचलत आहे. देशात गव्हाचे दर अनेक दिवसांपासून वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट कोलमडलं आहे. अशातच सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसू नये यासाठी गव्हाचे दर लवकरात लवकर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आहे. गव्हाच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने आता एक मोठे पाऊल उचलले आहे. 30 लाख मेट्रिक टन गहू खुल्या बाजार विक्रीसाठी आणला जाणार आहे. देशातील गहू आणि पिठाच्या वाढत्या किंमतीवर तोडगा काढण्यासाठी, गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील मंत्री गटाची बैठक झाली होती. या बैठकीत देशातील बफर स्टॉकच्या स्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली होती.

भारतीय अन्न महामंडळाकडे (FCI) बाजारात गहू उतरवण्याची जबाबदारी आहे. ई-लिलाव म्हणजेच, ई-लिलावाद्वारे खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत गहू बाजारात आणला जाणार आहे. गव्हाचा साठा आटा मिलर्स आणि देशातील मोठ्या घाऊक खरेदीदारांना टेंडरद्वारे विकला जाईल. बाजारात गव्हाचा खप वाढला तर मागणी तेवढी राहणार नाही, असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे गहू आणि पिठाच्या दरात घसरण होऊ शकते. गव्हाचे दर 34 रुपयांवरून 29 रुपये किलोपर्यंत येतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशातील गव्हाच्या किमती कमी करण्यासाठी सहकारी आणि सरकारी कंपन्यांनाही गहू दिला जाणार आहे. केंद्र सरकारकडून केंद्रीय भांडार, एनसीसीएफ आणि नाफेडलाही गहू दिला जाणार आहे. केंद्र सरकार त्यांना 2 हजार 350 रुपये प्रति क्विंटल दराने टेंडरशिवाय गहू विकणार आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम