कृषी सेवक | १७ ऑक्टोबर २०२२ |पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत पीएम किसान सन्मान संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी 16 हजार कोटी रुपयांचा 12 वा हप्ताही जारी करण्यात आला. दिवाळीपूर्वी पीएम मोदींनी शेतकऱ्यांना ही भेट दिली आहे. यामुळे पीएम मोदींनी हप्ता जारी करताच देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा झाले आहेत.
16 हजार कोटी एकाच वेळी जमा होणार आहेत. देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास 16000 कोटी रुपये क्षणार्धात पोहोचणार आहेत. गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा उद्देश आहे. केंद्र सरकारने दिलेल्या नमुन्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न, मालमत्ता इत्यादी तपशील भरले जातात. शेतकऱ्याचे बँक खाते व इतर माहिती कृषी विभागात दिली जाते.