कृषी सेवक | २२ नोव्हेंबर २०२२ | देशात आता लग्नसराईचा हंगाम सुरु झाला. या काळात बेसणला मागणी जास्त असते. तसेच हरभरा डाळीलाही उठाव असतो. मात्र असं असूनही हरभरा दर दबावात आहेत.
नाफेडच्या विक्रीचा जास्त दबाव हरभरा दरावर असल्याचं जाणकार सांगतात. सध्या हरभऱ्याला खुल्या बाजारात ४ हजार ५०० ते ४ हजार ८०० रुपये दर मिळतोय. या दरात क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांची तेजीमंदी येऊ शकते, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.