7th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ग्रॅच्युइटी मर्यादा २५ लाखांवर

बातमी शेअर करा

केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. रिटायरमेंट ग्रॅच्युइटी आणि डेथ ग्रॅच्युइटीची मर्यादा २५ टक्क्यांनी वाढवून २० लाखांवरून २५ लाख रुपये करण्यात आली आहे. ही वाढ १ जानेवारी २०२४ पासून लागू होणार आहे, ज्याचा कर्मचारी वर्गाला मोठा फायदा होईल.

महागाई भत्त्यात (DA) ४ टक्के वाढ केल्यानंतर आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए मूळ वेतनाच्या ५० टक्के झाला आहे. या वाढीनंतर रिटायरमेंट ग्रॅच्युइटी आणि डेथ ग्रॅच्युइटीसह इतर भत्त्यांमध्येही वाढ अपेक्षित होती, जी आता करण्यात आली आहे.

Cotton Seed : विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस बियाण्याची टंचाई: शेतकऱ्यांमध्ये गोंधळ

कोणाला होणार लाभ?

१ जानेवारी २०२४ नंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. एप्रिल महिन्यात ग्रॅच्युइटी वाढीची घोषणा करण्यात आली होती, परंतु ती ७ मे रोजी थांबवण्यात आली. पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी अॅक्ट १९७२ नुसार, एखाद्या कर्मचाऱ्यानं एखाद्या संस्थेत किमान पाच वर्षे सलग काम केलं असेल तर त्याला ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो.

सिन्नर तालुक्यातील 60 टक्के शेतकरी अडचणीत; अर्थकारणच पूर्णतः बिघडल…

मार्चमध्ये महागाई भत्त्यात वाढ

मार्च महिन्यात केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केली होती, ज्यामुळे डीए ५० टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाईपासून मोठा दिलासा मिळाला आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment