आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी मोठा निर्णय : कृषीमंत्र्यांनी घेतला पुढाकार !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २० नोव्हेबर २०२३

राज्यातील शेतकऱ्यांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या काळात संकटांचा सामना करावा लागत असून या संकटांमुळे शेतकरी हवालदील आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी टोकाचा निर्णय घेतात. आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नाहीत तर त्या कुटुंबासमोरचे प्रश्न आणखी वाढत जातात. हजारो शेतकरी कर्जाच्या बोजामुळे आत्महत्या करतात. अशातच आता आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी एक मोठी बातमी आहे.

आता राज्यातील विविध जिल्ह्यांतील २ हजार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना विविध शेती आणि संसार उपयोगी साहित्याचे किटच वितरण करण्यात येणार आहे. यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शेतकरी कुटुंबास मदतीचा हात-संवेदन २०२३ असे या सरकारच्या उपक्रमाचे नाव आहे.
दरम्यान, याबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या सूचनेनुसार कृषिमंत्रालय अंतर्गत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे. यात नॅनो युरिया, भाजीपाला बियाणे,सूक्ष्म मूलद्रव्य, वेगवेगळ्या कीटकनाशकांचा समावेश आहे. दिवाळी फराळसाठी उपयुक्त साहित्य आणि महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळातर्फे उत्पादित वस्तूंचा देखील यात समावेश केला आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment