७ एप्रिलला शेतकऱ्यांकडून देशभरात भव्य मिरवणूक; रेलवे वाहतूकही थांबवणार!

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ४ एप्रिल २०२४ | हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी देशातील शेतकरी १३ फेब्रुवारीपासून आंदोलन करत आहेत. शंभू बॉर्डर, खनौरी, डबवली, रतनपुरा बॉर्डर या ठिकाणी शेतकरी सदर आंदोलन करत आहेत. अशातच आता ७ एप्रिल रोजी देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी संघटनांकडून मिरवणूक काढली जाणार असून देशात ठिकठिकाणी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे. संयुक्त किसान मोर्चासह प्रमुख शेतकरी संघटनांनी चंदीगड येथे पत्रकार परिषदेत ही माहिती जाहीर केली आहे.

याशिवाय ९ एप्रिल रोजी शंभू सीमेवर रेल्वे वाहतूक रोखण्यात येणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. इतकेच नाही तर केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या दक्षिणेकडील राज्यांमध्ये देखील ३ ते ११ एप्रिल या कालावधीत तरुण शेतकरी शुभकरन सिंह याच्या श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात केले जाणार आहे. असे शेतकरी संघटनांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने अलीकडेच काही बाजार समित्या रद्द करण्याचे आदेश देखील जारी केले आहेत. तसेच काही बाजार समित्यांमध्ये गव्हाची साठवणूक केली जात आहे. हे देशभरात पुन्हा ३ कृषी कायदे करण्याचे द्योतक असल्याचेही शेतकरी संघटनांनी म्हटले आहे.

 

शेतकरी आंदोलनाच्या घोषणेआधी १० फेब्रुवारीपासून हरियाणात शेकडो शेतकऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यातील ५ शेतकरी नेते अजूनही तुरुंगात आहेत. या शेतकरी नेत्यांची सुटका करण्यात यावी. अशी मागणी देखील सदर प्रसंगी करण्यात आली आहे. तर शंभू बॉर्डर, खनौरी, डबवली, रतनपुरा बॉर्डर येथे शेतकरी धरणे आंदोलन करत असल्याचेही शेतकरी संघटनांनी यावेळी म्हटले आहे.

बातमी शेअर करा
#farmersforindia#FarmersProtestInDelhi#farmersspecialnews#indialove#latestbreakingnews#viralpostsoffarmers
Comments (0)
Add Comment