कृषी सेवक I ३ डिसेंबर २०२२ I नाफेडने अनेक राज्यांमध्ये उडदाची खरेदी सुरु केली. मात्र नाफेडला आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात खरेदी करता आली नाही. कारण सध्या खुल्या बाजारात उडदाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळत आहे. केंद्राने यंदा उडदासाठी ६ हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र सध्या बाजारात ६ हजार ८०० ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. देशातील उत्पादन आणि मागणीचा विचार करता उडदाचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज प्रक्रियादारांनी व्यक्त केला आहे.