अन मुख्यमंत्री शिंदेंनी केली शेतात मशागत !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | ७ नोव्हेबर २०२३

सातारा जिल्ह्यातील दरे या आपल्या मूळगावी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच राजकारणातून वेळ काढून दोन दिवसीय सुट्टीवर येत असतात. यावेळी त्यांनी शेतातील पिकांची पाहणी करत स्वतः मशागतीची कामे केली. तसेच स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या शेतात चंदनाच्या झाडांसह बांबू, स्ट्रॉबेरी आणि हळदीची लागवड केली आहे. सुट्टीवर आल्यानंतर त्यांनी शेतात चाकाच्या कुदळाच्या साहाय्याने आपल्या हळद पिकाची कोळपणी केली.

सातारा येथे आपल्या गावी आलो की माझे पाय आपोआप शेताकडे वळतात. शेती-मातीशी माझी नाळ जोडली गेली आहे. शेतकऱ्याचा मुलगा असल्याने मी गावी आलो की आवडीने शेतात काम करतो. शेतात काम केल्याने एक वेगळाच आनंद मिळतो, असे एकनाथ शिंदे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले. मुलगा श्रीकांत याने शेतीत मोठे कष्ट घेतले असून, शेतीतील सुधारणांवर त्याचा भर असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

बातमी शेअर करा
#cmshinde#farmer
Comments (0)
Add Comment