कृषीसेवक | १७ नोव्हेबर २०२३
जगभरातील प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात अनेक पदार्थाचा वापर होत असतो पण प्रत्येक भाजीमध्ये नेहमीच हिंग वापरत असतात. कारण त्याला काहीशी उग्र चव असल्यामुळे जेवणाला देखील चांगली चव येत असते. त्यामुळे गृहिणी हमखास हिंगाचा वापर करतात. आयुर्वेदानुसार हिंगाचे खूप फायदे आहेत. फराळी चिवड्यांमध्ये, लोणचे यांसारख्या पदार्थांमध्ये त्याचा वापर करतात. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? हिंग भारतीय पीक नाही. भारतात हिंग खूप उशिरा आला. हिंग भारतीय नाही, तर मग तो कोठून आणि कसा आला? असा प्रश्न अनेकांना पडतो. दरम्यान, हिंग इराण ओलांडून भूमध्यसागरी प्रदेशांत परिचित होते.
अलेक्झांडर द ग्रेटच्या मोहिमांनंतर ते युरोपात आले आहे, असे बोलले जात आहे. इशान्य प्राचिन पर्शियाच्या सहलीवरून परतल्यानंतर त्यांना असे समजले की उत्तर आफ्रीकेत एक चवदार वनस्पती सापडली असून त्याची चव खूप विलक्षण आहे. समजा एखाद्याने हिंगाचा स्वाद घेतला तर त्याच्या काहीश्या वासाने अंगावर शहारे आले . त्यानंतर हळूहळू युरोपात हिंग वापरात आला. परंतु त्याची चव इतकी आगळी वेगळी होती की चव लोकांना आवडत नव्हती. जरी भारतातील आयुर्वेदात हिंगाचे उल्लेख असला तरी हिंगाचे पीक अरबांची देण आहे, असे सांगितले जात आहे. हिंगाची चव ही प्राचीन काळापासून आहे.
हिंगाची जाड दुधामध्ये मैदा आणि डिंक मिसळून खाण्यायोग्य बनवतात. यानंतर पेस्ट 30 दिवस उन्हामध्ये वळवण्यात येते. ते मिश्रण कोरडे व्हावे यासाठी ड्रायरचा वापर करता येत नाही. असे केल्याने त्याचा सुवास नष्ट होतो. त्यानंतर त्याची पावडर तयार करतात.
अफगाणिस्तानच्या उच्च प्रदेशातील हिंदुकुश टेकड्यांमध्ये कच्च्या हिंगाचे घनरूप दूध गोळा करण्यात येते. इराण आणि उझबेकिस्तानच्या थंड भागात आढळते. पूर्वी बकऱ्याच्या चामडीत बंद करुन ट्रान्सपोर्ट केले जायचे. आता ते भारतात दुधाची पिशवी किंवा जाड प्लास्टिकमध्ये गुंडाळून आणतात.