‘या’ कारणाने जनावरे राहू शकत नाही गाभण !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २० ऑगस्ट २०२३ | राज्यातील अनेक शेतकरी जोड व्यवसाय म्हणून पशुपालन करीत असतात, त्यामुळे त्यांना मोठा फायदा देखील होत असता, पण जनावरांना दिल्या जाणाऱ्या चाऱ्यांमधून पोषणमुल्यांचा अभाव झाल्यास अभाव झाल्यास जनावरे गाभण राहत नाहीत. गर्भाशयातील वासराचे वजन योग्य प्रमाणात वाढत नाही. १५ ते ३० दिवस आधी जनावर विते.

जनावर व्यायल्यानंतर जार अडकणे, भूक मंदावणे ही लक्षणे दिसतात. तसेच जनावरे चप्पल, प्लास्टिक, दगड अशा अखाद्य वस्तू खातात, त्यामुळे जनावर दगावण्याची शक्यता असते. याचे कारण त्या जनावरांच्या शरीरात क्षारांचा (खनिजांचा) अभाव झालेला असतो. त्यामुळे जनावरे वेडीवाकडी चालतात. त्यामुळे जनावरांना खनिज मिश्रण देणे आवश्यक असते.

अनेक पशुपालकांच्या गोठ्यात दुधाळ जनावरे गाभण न राहणे, दुध उत्पादनात घट येणे रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, आदी समस्यांना सामोरे जावे लागते. जनावरांनी चारा खाल्ल्यानंतर त्यातील घटकांचे विघटन होऊन त्याचे रुपांतर दुधामध्ये होते. गायी किंवा म्हशीच्या दुधात ८० ते ८८ टक्के पाणी असते. या दुधामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, क्षार तसेच इतर घटक असतात. दूध घट्ट करणे हे एसएनएफ चे काम असते. मका, कडवळ, गवती घास या हिरव्या चाऱ्यातून तसेच पशुखाद्यातुन पोषणमूल्य मिळतात. मोठ्या जनावरांना ३० ते ५० ग्रॅम व लहान वासरांना १० ते २० ग्रॅम खनिज मिश्रण दररोज द्यावे. मात्र जनावरांची योग्य गरज ओळखून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांना खनिज मिश्रण देण्याचे प्रमाण ठरवावे. तसेच वासराच्या गोठ्यामध्ये चाटण विटा टांगून ठेवाव्यात.

बातमी शेअर करा
#animals
Comments (0)
Add Comment