सरकारी खरेदी सुरू होण्यापूर्वीच मक्याच्या भावात मोठी वाढ

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ४ एप्रिल २०२४ | देशात सरकारी खरेदीच्या निर्णयानंतर मक्याचे भाव वाढले आहेत. इथेनॉलसाठी सरकारी मका खरेदीला त्याचा फटका बसण्याची मोठी भीती आहे. गेल्या हंगामात मक्याची दोन हजार नव्वद रुपये इतक्या एमएसपी दराने खरेदी केली गेली होती. परंतु, लागवड जास्त असूनही, गेल्या वर्षीच्या ३८ दशलक्ष टन उत्पादनाच्या तुलनेत यंदा मका उत्पादन ३२.४ दशलक्ष टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे.

 

बिहारमध्ये सध्या मक्याचे सरासरी भाव २,४०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. फेब्रुवारी अखेरीस हा भाव २,३०० रुपये प्रति क्विंटल इतका होता. यंदा बिहार बरोबरच कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्येही गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक मका लागवड आहे. यामुळे एप्रिलच्या अखेरीस रब्बी मका बाजारात येण्यास सुरुवात होईल, त्या वेळी हे भाव खाली येतील, असे सरकारी यंत्रणा सांगत आहेत.

दुसरीकडं, साखरेचा मुबलक पुरवठा प्रभावित होऊ नये म्हणून, इथेनॉल उत्पादनासाठी ऊसाच्या मळीऐवजी मक्याचा वापर सध्या होत आहे. इथेनॉल निर्मितीसाठी उसाचा रस वापरण्यावर साखर कारखान्यांना बंदी घालण्यात आली असून एमएसपी दराने सरकारी मका खरेदी करणाऱ्या केंद्रीय एजन्सींनी ४० हून अधिक डिस्टिलरीजसोबत सामंजस्य करार केले आहेत.

बातमी शेअर करा
#agriculture#agriculturenews#agrinews#latestagrinews#viralagrinews
Comments (0)
Add Comment