हरभऱ्यातील तेजी मर्यादीत राहील

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १४ डिसेंबर २०२२ I हरभऱ्याचे भाव मागील रब्बी हंगामातील हरभरा बाजारात आल्यापासून दबावात आहे. मात्र आता हरभरा दरात काहीशी सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाल्याचं जाणकार सांगतात.

चालू रब्बी हंगामात हरभरा पेरा कमी होण्याचा अंदाज आहे. तर सध्या देशात चांगल्या दर्जाच्या हरभऱ्याचा तुटवडा जाणवत असल्याचं व्यापारी सांगतात. तसंच खरिपातील तूर, मूग आणि उडीद या कडधान्याचं उत्पादन कमी झालंय. तुरीचे दरही तेजीत आहेत.

 

त्यामुळं तुरीची काही मागणी हरभऱ्याकडं वळू शकते. या सर्व घटकांमुळे स्टाॅकिस्ट बाजारात संधी शोधत आहेत. सध्या हरभऱ्याला ४ हजार ३०० ते ४ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. त्यामुळे स्टाॅकिस्ट आणि व्यापाऱ्यांना जोखीम कमी आहे. देशातील एकूण हरभरा वापरापैकी तब्बल ५० टक्के वापर हा हाॅटेल, रेस्टाॅरेंट्स आणि प्रक्रिया उद्योगात होतो. या सर्व क्षेत्रातून मागणी चांगली आहे. मात्र नाफेडकडेही हरभऱ्याचा चांगला स्टाॅक आहे. त्यामुळं हरभऱ्यातील तेजी मर्यादीत राहील.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment