शेतकऱ्यांची केंद्र सरकार करणार दिवाळी गोड : १५ वा हफ्ता येणार !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | ६ नोव्हेबर २०२३

केंद्र सरकार नेहमीच देशातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी विविध योजनेच्या माध्यमातून मदत करीत असते. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दरवर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात. दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाते.

आतापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेतील 14 हप्त्यांचा लाभ मिळाला आहे. तर शेतकरी या योजनेतील 15 व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. पीएम किसान योजनेतील 15 व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट बघत आहे. हा हप्ता शेतकऱ्यांना 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत जारी केला जाऊ शकतो.

मात्र, केंद्र सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. या योजनेतील पंधरावा हप्ता जारी झाल्यानंतर शेतकरी या https://pmkisan.gov.in लिंकला भेट देऊन लाभार्थ्यांची यादी तपासू शकतात. तर या योजनेतील 15 व्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी, आधार कार्ड लिंक आणि जमिनीची पडताळणी करणे अनिवार्य आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment