कृषी सेवक | २६ नोव्हेंबर २०२२ |राज्यात सर्वाधिक जनावरांचा ‘लम्पी स्कीन’मुळे मृत्यू बुलडाणा जिल्ह्यात झाले आहेत. या बाबीची दखल घेत राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्राच्या पथकाने जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात कुंड खुर्द येथे भेट देऊन जनावरांची पाहणी केली.
लम्पी स्कीन आजारचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या समितीने राज्यात काही जिल्ह्यांचा दौरा केला. मलकापूर तालुक्यात भेट देऊन पाहणी केलेल्या समितीत दिल्ली येथील पशुसंवर्धन विभाग, कृषी भवन येथील विभागीय अधिकारी डॉ. विजयकुमार, शास्त्रज्ञ डॉ. मंजुनाथ रेड्डी (बंगळूर), सहायक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. सुनील लहाने (पुणे) आदी उपस्थित होते.