देशाच्या हवामानात बदल ; हवामान विभागाची माहिती !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २ नोव्हेबर २०२३

देशभरातील अनेक राज्यात पावसाने यंदा उशिरा हजेरी लावल्याने अनेक शेतकरी हैराण झाले होते. काही भागांमध्ये अपेक्षित पाऊस पडला नाही. त्यामुळे काही भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाविना शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. हवामानात बदल झाल्याने देशाच्या काही भागात थंडीची चाहूल लागली आहे. अशातच आता हवामान खात्याने पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत दक्षिणेकडील केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळमधील वेगवेगळ्या ठिकाणी हलका ते मुसळधार पाऊस पडू शकतो. येत्या 24 तासांत देशभरात हवामान कसे असेल याबाबत जाणून घेऊया सविस्तर माहिती.

हवामान खात्याच्या मतानुसार, येत्या 24 तासांत किनारी आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडेल. किनारपट्टी आणि दक्षिण आतील कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल. आज आणि उद्या हिमाचलमध्ये हलक्या पावसासह बर्फवृष्टी होऊ शकते. IMD नुसार, आजपासून 5 नोव्हेंबरपर्यंत हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये विविध ठिकाणी पाऊस किंवा बर्फवृष्टी होईल.

बातमी शेअर करा
#Weather
Comments (0)
Add Comment