मक्याचे दर टिकून

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २३ डिसेंबर २०२२ I खरिपातील मका आवक सध्या बाजारात वाढतेय. मात्र आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. खरिपातील पिकाला यंदा पावसाचाही फटका बसलाय. रब्बीतील मका पेरणीचा वेग सध्या गेल्यावर्षीपेक्षा २३ टक्क्यांनी अधिक दिसतोय. पण शेवटच्या टप्प्यात पेरा कसा राहतो? यावर बाजार अवलंबून राहील. सध्या मक्याला देशात सरासरी २ हजार ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. पुढील काळात मका दरात २०० रुपयांपर्यंत सुधारणा होऊ शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment