कापसाला चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्याला अपेक्षा

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३१ ऑक्टोबर २०२२ | सुतगिरण्यांकडून सध्या कमी मागणी असल्याने कापसाचा बाजार जेमतेम असल्याचे सांगितले जात आहे. सध्या कापसाला ६ हजार रुपयांपासून ८ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने शेतकरी थोडा अडचणीत सापडला आहे. जास्त भाव मिळावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र जाणकारांच्या मते, सध्या शेतकऱ्यांच्या घरात कापूस आल्याने व्यापारी कमी भावात खरेदी करण्याचा प्रयत्न करू शकतात .मात्र पण शेतकऱ्यांनी दोन महिने वाट पाहिल्यास कापूस दरात सुधारणा होऊ शकते. शेतकऱ्यांना सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment