कापूस दर क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांनी सुधारले

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ५ नोव्हेंबर २०२२ | देशातील कापूस दर क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांनी सुधारले. देशपातळीवर कापसाला सरासरी ७ हजार ते ८ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. तर राज्यातील सरासरी दर ७ हजार १०० ते ८ हजार ५०० रुपये क्विंटल राहिला. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर सुधारल्याने देशातील बाजारालाही आधार मिळाला. कापसाचे दर जास्त दिवस आटोक्यात राहणार नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी वाढल्यास देशातही कापसाचे दर सुधारतील. फेब्रुवारीपर्यंत कापूस सरासरी ९ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहचू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करावी, असा सल्ला जाणकारांनी दिला आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment