शेतकरी समोर संकट : लष्करी अळीपासून असा करा सामना !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । १३ फेब्रुवारी २०२३। देशातील शेतकरी नेहमी कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामान करीत असतो आता पुन्हा शेतकरी एका मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. मका पिकावरील लष्करी अळी (स्पोडोप्टेरा फुगीपर्डा) ही अमेरिकेतील मका पिकावर उपजीविका करणारी कीड असून जून २०१८ मध्ये तिचा भारतात सर्वप्रथम प्रादुर्भाव दिसून आला.
या किडीमुळे मका पिकाचे नुकसान होत असते. सध्या खरीप हंगामात देखील या किडीमुळे मका पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या किडीच्या व्यवस्थापणासाठी एकात्मिक कीड नियंत्रणाचे उपाय करणे गरजेचे आहे.

खाद्य वनस्पती : ही किड बहुभक्षीय असून ८० पेक्षा जास्त वनस्पतीवर आपली उपजिविका करते. परंतू गवतवर्गीय पिके हे या किडीचे सर्वात आवडते खाद्य आहे. ही कीड सर्वात जास्त मका, मधू मका, ज्वारी यावर उपजिविका करतांना आढळून येते. हराळी, सिंगाडा, कापूस, रान मेथी, मका, ओट, बाजरी, वटाणा, धान, ज्वारी, सोयाबीन, ऊस, तंबाखू व गहू या पिकांवर वारंवार प्रादुर्भाव होतो. भाजीपाल्यामध्ये फक्त मधूमक्यावर नियमित प्रादुर्भाव असतो. परंतू इतर भाजीपाला, फळ पिकामध्ये सेप, अंगूर, संत्रा, पपई, पीच, स्ट्रॉबेरी व इतर फुलपिकाचे कधी-कधी नुकसान करते. किडीचा जीवनक्रम : लष्करी अळीचा जीवनक्रम अंडी, अळी, कोष व पतंग या चार अवस्थेमधून पूर्ण होतो. या अळीची ३० दिवसात एक पिढी पूर्ण होत असून अखंड खाद्य मिळाल्यास ३ ते ४ पिढ्या विविध वनस्पतीवर पूर्ण होऊ शकतात.
अंडी अवस्था : अंडी अर्ध गोलाकार असून पानावर एका समुहात १०० ते २०० अंडी देते. अंडी समूह केसाळ व राखाडी/भुऱ्या रंगाच्या लव किंवा मऊ केसाने झाकलेले असतात. अंडी देण्याचा कालावधी उन्हाळ्यात फक्त २ ते ३ दिवसाचा असतो. अळी पुर्ण वाढ झालेल्या अळीचे तोंडावर पांढुरक्या रंगाचे उलट्या वाय Y आकाराचे चिन्ह असते. तर मागील बाजूस शेवटी चौकोनात चार फुगीर गोल गडद किंवा हलक्या रंगाचे ठिपके असतात.

कोष अवस्था : चकाकणाऱ्या तपकीरी रंगाचे कोष सामान्यतः २ ते ८ सें.मी. खोल जमिनीत असतात. अळी स्वतः भोवती अंडाकृती, मातीचे कण व रेशीम धागा एकत्र करून मैल कोष तयार करते.
प्रौढ अवस्था : नरामध्ये समोरच्या पंखावर राखाडी व तपकीरी रंगाच्या छटा असून टोकाला व मध्य भागाजवळ त्रिकोणी पांढरे ठिपके असतात. मादीमध्ये समोरचे पंख नरापेक्षा कमी चिन्हांकीत असून त्यावर राखाडी व तपकरी रंगाचे ठिपके असतात. मागील दोन्ही पंख मोहक चंदेरी पांढरे असून त्यावर आखुड गडद रंगाची किनार असते.
पतंग अवस्था : सरासरी १० दिवसाची असून ती ७ ते २१ दिवसापर्यंत असू शकते. प्रौढ निशाचर असून मादी सामान्यतः बहुतांश अंडी पहिल्या चार पाच दिवसाच्या कालावधीत देते.

नुकसान : अळ्या पाने खाऊन पिकाचे नुकसान करतात. नुकत्याच अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या पानाचा हिरवा पापूद्रा खातात. त्यामुळे पानाला पांढरे चट्टे पडतात. दुसऱ्या ते तिसऱ्या अवस्थेतील अळ्या पानाला छिद्रे करतात. पानाच्या कडा खातात. अळ्या मक्याच्या पोंग्यामधे राहून पानाला छिद्रे करतात. त्यामुळे पोंग्यातून बाहेर आलेल्या पानावर सरळ एकसमान छिद्रे दिसतात. सर्वसाधारण एका झाडावर एक किंवा दोन अळ्या राहतात, कारण त्या जवळ आल्यास एकमेकांना खातात. जुनी पाने मोठ्या प्रमाणात पर्णहीन होऊन पानाच्या फक्त मध्य शिरा व व झाडाचे मुख्य खोड शिल्लक राहते. झाड फाटल्यासारखे दिसते पोंगा धरण्याची सुरूवातीची अवस्था प्रादुर्भावास कमी बळी पडते, मध्यम पोंगे अवस्था त्यापेक्षा जास्त तर उशीरा पोंगे अवस्था अळीला सर्वात जास्त बळी पडते. अळी काही वेळा कणसाच्या बाजुने आवरणाला छिद्र करून दाणे खाते. दिवसा अळी पोंग्यात लपून राहते.

मशागतीय पध्दती –
यांत्रीक पद्धती –
जैविक नियंत्रण : रोपे ते सुरूवातीची पोंगे अवस्थेत ५ टक्के पोंग्यामध्ये तसेच १० टक्के कणसामध्ये प्रादुर्भाव आढळल्यास जैविक किटकनाशकांची फवारणी करावी. * बॅसीलस थुरीजीअसीस व कुर्सटाकी २० ग्रॅम / १० लि. पाणी किंवा ४०० ग्रॅम / एकर याप्रमाणे फवारणी करावी.
रासायनिक किटकनाशकांचा वापर : फवारणी सायंकाळी किंवा सकाळी करावी. तसेच द्रावणाचे जाडसर तुषार पोंग्यामध्ये पडेल अशा प्रकारे फवारणी करावी म्हणजे अळ्यांचे प्रभावी नियंत्रण करता

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment