नंदुरबार जिल्ह्यातील चिनोदा परिसरात कापसाच्या उत्पादनात घट

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १९ नोव्हेंबर २०२२ | यावर्षी कापसाच्या तळोदा तालुक्यातील चिनोदासह परिसरात उत्पन्नात मोठी घट झाली असून एकरी फक्त सहा ते सात क्विंटल पर्यत कापसाचे उत्पादन आल्याने कापूस उत्पादक शेतकर्‍यांनमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तसेच लावलेला खर्चही निघणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान जून महिन्यात तुरळक प्रमाणात पाऊस झाला. तर जुलै महिन्यात बर्‍यापैकी पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात तर संततधार पाऊस होता. या तीन महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतशिवारातील पिके डोलू लागल्याने शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत होते. मात्र ज्यावेळेस कापसाची बोंडे फुटण्याच्या अवस्थेत होती नेमके त्याचवेळी परतीच्या पावसामुळे ऑक्टोबर महिन्यात कापसाची बोंडे काळी पडली तर काही बोंडे गळून फुलपात्री सुध्दा गळून पडल्यामुळे कापूस उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान झाले.

त्यामुळे कापूस उत्पादक शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. चिनोदासह परिसरात कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येत असते. हा कापूस बहुतांश स्थानिक व्यापार्‍यांच्या माध्यमातून विक्री होतो.

 

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment