दै. बातमीदार | ४ एप्रिल २०२४ | अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या माध्यमातून विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते.
त्याच प्रमाणे, महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय, महसूल व वन विभाग दि.२७.०३.२०२३ अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत. वर नमूद क्र.५ येथील दि.०९.११.२०२३ च्या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर, २०२३ या कालावधीतील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे.
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
खरीप हंगाम-२०२३ करिता दुष्काळ जाहिर केलेल्या ४० तालुक्यांमधील खातेदारांना कृषि विषयक मदतीसाठीं निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता वर नमूद क्र.२ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण रु.२४४३२२.७१ लक्ष (अक्षरी रुपये दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लक्ष एकाहत्तर हजार फक्त) इतका निधी वाटप करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.