शेतकरी आनंदी : सोयाबीनचे दर वाढले !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । १६ जानेवारी २०२३ ।  शेतकऱ्यांना कमी कालावधीत चांगले पैसे मिळवून देणारी राज्यात सोयाबीनची लागवड केली जाते. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात सोयाबीनचं उत्पादन शेतकऱ्यांकडून घेतलं जातं. सोयाबीनला गेल्या दोन वर्षांमध्ये मिळालेल्या दरामुळं शेतकऱ्यांनी विक्रीची पद्धत बदलली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला सोयाबीनचा दर काहीसा वाढला होता. नंतर सोयाबीनच्यादरात घसरण झाली होती. राज्यातील वाशिम जिल्ह्यात सोयाबीनचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं. वाशिममध्ये आज सोयाबीनच्या दरात २५० रुपयांची वाढ झाली आहे.

करोना काळात आणि गेल्यावर्षी सोयाबीनचा दर ११ हजारापर्यंत गेल्यानं शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शेतकऱ्यांनी दरवाढीसाठी मोठ्या प्रमाणात सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणलेले नाही. सोयाबीन उत्पादक शेतकरी दरवाढीची वाट पाहत आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी एका क्विंटलला किमान ७ हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळं आज जरी दरवाढ झाली असली तरी हे दर आणखी वाढायला हवेत अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

चना -३८५० ते ४५००
तूर-६२०० ते ७३५०
उडीद-४५०० ते ५५००
मुंग-५५०० ते ६०५०
गहू -१९०० ते २७११
ज्वारी – १६०० ते २०००

बातमी शेअर करा
#soybean
Comments (0)
Add Comment