शेतकऱ्यानी दिला महावितरणला शॉक : अंधारात राहू पण…

बातमी शेअर करा

कृषी सेवक । १० जानेवारी २०२३ ।  राज्यातील शेतकरी व महावितरण मधील वाद गेल्या काही दिवसपासून थांबण्याचे नाव घेतच नाही. आहे. त्या वादाची सुरुवात महावितरणने शेतकऱ्यांना अंधाधुंद दिलेल्या बिलांमुळेच राज्यातील शेतकरी हैराण झाले होते.

बीड तालुक्यातील १२ हजार नागरिकांना रीडिंग न घेता अंदाजे जास्तीच्या वीज बिलाचा शॉक दिला जात आहे. यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. खंडाळा गावातील नागरिकांनी आपली व्यथा मांडली आहे. अंधारात राहू तुमचे बिलही नको आणि लाईट नको अशी भावना ग्रामस्थांनी मांडली.

विजेची आकडे टाकून चोरी करणाऱ्या लोकांना मात्र महावितरणचे पाठबळ आहे. आम्ही तुमचे मिटर घेऊन चुक केलीय का असा सवाल संतप्त ग्रामस्थ विचारत आहेत. अनेकांच्या घरात अगदी कमी वीज वापरून देखील मोठ्या प्रमाणावर बिल आले आहे. घरात दोनच विजेचे बल्प आहेत. मात्र बिल 34,000 आले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मजुरी करणाऱ्या कुटुंबाने एवढे मोठे बील भरायचे कसे असाच प्रश्न आता त्या नागरिकांपुढे आहे.मीटर रीडिंग न घेता तिरूपती नावाची कंपनी शहरात बसून रिडींग टाकते. त्यामुळे बिलाचे आकडे वाढत आहेत. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment