शेतकरी आर्थिक अडचणीत ; सोयाबीनच्या दरात घसरण !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २८ जानेवारी २०२३ ।  राज्यात गेल्या महिन्यापासून सुरु असलेल्या हिवाळ्याच्या थंडीने शेतकरीचे चांगलेच नुकसान करून ठेवले आहे. तर गेल्या आठवड्यात काही भागात पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे गेल्या वर्षाच्या एप्रिल महिन्यात सोयाबीनला साडेसात हजार रुपये मिळणारे दर आता पाच हजार रुपयांपर्यंत येऊन पोहोचल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडण्याची भीती व्यक्त केली जाते.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सोयाबीनला साडेसात हजार रुपये बाजार भाव मिळाला होता मात्र राज्यातील बाजार समित्यांमध्ये मागणीच्या तुलनेत सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात येत असल्याने तसेच सोयाबीनची डीओसी आणि तेलाला देशासह विदेशात मागणी नसल्याने लासलगाव व पिंपळगाव बाजार समितीच्या पालखेड मिरची येथील उपबाजार आवारात सोयाबीनच्या बाजार भावात घसरण झाली असून पाच हजार रुपयांपर्यंत दर पोहचले आहे. येणाऱ्या दिवसात दर वाढण्याची शक्यता कमी असून पाच हजार रुपये पर्यंत दर राहतील असे धान्य व्यापारी सांगत आहे. अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाली महागडी औषधे फवारणी करत पिक वाचवले आज विक्रीसाठी सोयाबीन आणली असतात जास्तीजास्त 5325 रुपये , कमीतकमी 3500 रुपये तर सरासरी 4500 ते 5000 हजार रुपये प्रत्येक क्विंटल ला बाजारभाव मिळाल्याने उत्पादन वाहतूक मजुरीही निघत नसल्याने आर्थिक संकटात सापडल्याचे सोयाबीन उत्पादक शेतकरी बोलत आहे.

बातमी शेअर करा
#soybeans
Comments (0)
Add Comment