खान्देशातील शेतकरी मोठ्या संकटात !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १९ ऑगस्ट २०२३ | देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने अनेक शेतकरीचे पिक संकटात आले आहे तर काही राज्यात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसू लागला आहे. नंदूरबार तालुक्याच्या पूर्व भागात पाऊस गायब झाल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. त्याचबरोबर पिकांची वाढ खुंटली आहे. पिकांना पावसाच्या पाण्याची नितांत गरज आहे. पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर आता एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे. पावसाळ्यातील दोन महिने उलटले असले, तरीही पूर्व भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांनी हलका ते मध्यम पावसावर पिकांची पेरणी आणि कापूस लागवड केली होती. शेतकऱ्यांनी निंदणी व कोळपणी अशी आंतर मशागतीचे कामे उरकून पिकांना खते आणि फवारणीचे कामे सुरू आहे.

शेती पिकाला पाणीचं नसल्याने फवारणी केल्याने काय फायदा होणार असे अनेक प्रश्न आता बळीराजासमोर उपस्थित झाला आहे. येणाऱ्या आठ दहा दिवसात पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावा लागणार अशी परिस्थिती आता नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात पाहायला मिळत आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये पाऊस गायब झाला आहे. तालुक्यात रिमझिम पावसानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी कशीबशी आटोपली आहे. जुलै महिन्याचा तिसरा आठवडा संपत आला तरी जोरदार पाऊस पडलेला नाही. शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. अनेकांना ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची व्यवस्था करावी लागली. मात्र जोरदार पाऊस नसल्याने बोरवेल पाणीपातळीही घटू लागली आहे. त्यामुळे शेतकरी अधिक चिंताग्रस्त आहेत.

बातमी शेअर करा
#farmer#rain
Comments (0)
Add Comment