दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | ३ नोव्हेबर २०२३

राज्यातील अनेक शेतकरीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात आता येत्या काही दिवसावर दिवाळी येवून ठेपली आहे. पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेअंतर्गत कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी विम्याच्या नुकसान भरपाईची २५ टक्के अग्रीम रक्कम देण्यात यावी. अशी सूचना राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती. त्यानुसार आता सहा जिल्ह्यांमधील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांना ६१३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई येत्या चार दिवसात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत येत्या तीन ते चार दिवसांमध्ये अंतिम निर्णय होईल, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान पेरणी न झालेल्या सांगली व पुणे जिल्ह्यातील सुमारे २६ हजार शेतकऱ्यांना २८ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. सद्यस्थितीत धाराशिव अकोला परभणी जालना नागपूर अमरावती या सहा जिल्ह्यांमधील सुमारे १२ लाख ८६ हजार १८५ शेतकऱ्यांना ६१३ कोटी १९ लाख रुपयांची नुकसान भरपाई येत्या दोन दिवसात दिली जाणार आहे.

बातमी शेअर करा
#diwali
Comments (0)
Add Comment