शेतकरी चिंतेत; सोयाबीन हंगाम सरला पण भावात सुधारणा नाहीच!

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ७ एप्रिल २०२४ | महाराष्ट्रात यावर्षीचा खरीप हंगाम अवघा काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे आता शेतकऱ्यांना बियाणे, खते यासाठी आर्थिक तजवीज करावी लागणार आहे. परंतु, असे असूनही गेल्या सहा महिन्यापासून हमीभावापेक्षा कमी असलेले सोयाबीन दर सुधारण्याचे नाव घेत नाहीये.

शेतकऱ्यांना जास्त भाव मिळेल या आशेने, सोयाबीन घरात साठवून ठेवला होता. मात्र, आता नवीन पेरणी हंगाम दोन महिन्यांवर आहे. तरी सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमी असलेले पाहायला मिळत आहे. सध्या शेतकरी मोठ्या विवंचनेत सापडले आहेत.

महाराष्ट्र हे देशातील क्रमांक दोनचे सर्वाधिक सोयाबीन उत्पादन करणारे राज्य आहे. परंतु, आज राज्यातील उदगीर, कारंजा, आंबेजोगाई, निलंगा, सिंदखेड राजा या निवडक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा कमाल दर हमीभावापेक्षा अधिक असल्याचे पाहायला मिळात आहेत. केंद्र सरकारने १०२३-२४ च्या खरीप हंगामासाठी सोयाबीन पिकासाठी ४६०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव निर्धारीत केला होता.

बातमी शेअर करा
#agriculture#AgricultureExport#indiandarmers#indianfarming#SoyabeanBajarBhav
Comments (0)
Add Comment