या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील जुन्नर बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात 341 गाईंची खरेदी-विक्री झाली. लोकल गाईंचे दर 20,000 ते 60,000 रुपये प्रतिगाय, तर सरासरी 45,000 रुपये होते. काल दिनांक 31 मे रोजी कल्याण बाजारात 3 गाईंची खरेदी झाली, ज्यामध्ये हायब्रीड गाईंची सरासरी किंमत 55,000 रुपये तर लोकल गाईंची सरासरी किंमत 40,000 रुपये होती.
बैलांच्या बाजारातील किंमती
शेतकऱ्यांनी या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर बैलांची विक्री केली. 30 मे रोजी खामगाव बाजारात 387 बैलांची आवक झाली, ज्यामध्ये दर 15,000 ते 30,000 रुपये होते. आठवडाभराचा आढावा घेतल्यास बैलांची सरासरी किंमत 17,000 ते 30,000 रुपये होती.
गाई आणि बैलांच्या बाजारातील वाढत्या किंमती पाहता शेतकऱ्यांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरला आहे. विक्रीच्या या दरांमुळे पशुपालकांना चांगला फायदा झाला आहे.