हवामान विभागाचा अंदाज : राज्यातील वातावरण बदलणार !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २० ऑक्टोबर २०२३

देशात गेल्या काही महिन्यापासून अनेक राज्यात पाऊस बरसत आहे तर काही भागात पाऊस नसल्याने अनेक शेतकरी हैराण देखील झाले आहे. सध्या अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या संभाव्य चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात वातावरण बदलण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांत दक्षिण-पूर्व आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात समुद्राच्या उष्ण तापमानामुळे बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.

२०२२ मध्ये, मान्सूननंतरच्या काळात अरबी समुद्रावर कोणतीही उष्णकटिबंधीय वादळे निर्माण झाली नव्हती. तर बंगालच्या उपसागरावर सीतारंग आणि मंडौस नावाची दोन उष्णकटिबंधीय वादळे निर्माण झाली होती.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात विकसित होणाऱ्या ‘तेज’ चक्रीवादळाचा थेट परिणाम मुंबईवर होईल असे बोलले जात आहे. यामुळे मुंबईला हाय अलर्ट देण्यात आला. राज्यात एका बाजूला तापमानात कमालीची वाढ होत असून मॉन्सूनने देशातून माघार घेतली आहे.  बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात उष्ण तापमानामुळे चक्रीवादळांची निर्मीती ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत होत असते. दक्षिण पूर्व आणि लगतच्या दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र १९ ऑक्टोबर रोजी त्याच क्षेत्रावर कायम राहणार आहे. ते जवळजवळ पश्चिम-उत्तर पश्चिमेकडे सरकण्यासाठी २१ ऑक्टोबर रोजी दाबामध्ये तीव्र होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती मुंबई हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment