पेरू लागवडीतून देखील शेतकऱ्याच्या पदरी निराशाच !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | ४ सप्टेंबर २०२३ | राज्यातील प्रत्येक शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडला असून आर्थिक विवंचनेत शेतकरी दिसत आहे. सध्या पावसाने दडी मारल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पाणीटंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

पिकांना देण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांची पिके डोळ्यादेखत नष्ट होऊ लागली आहेत. काही शेतकरी पिके वाचवण्यासाठी तांब्याने तर काही शेतकरी टॅंकरने पाणी घालत आहेत. यंदा पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले आहे. दरम्यान, बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील एका शेतकऱ्याच्या फळबागेला देखील याचा चांगला फटका बसला आहे

डोर्लेवाडी या ठिकाणचे रवींद्र चव्हाण यांचे यंदाच्या वर्षी मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी जवळपास 20 ते 30 टन उत्पादन कमी मिळणार आहे. तसेच पाऊस नसल्याने पेरूला दर मिळत नसल्याचे देखील चव्हाण सांगतात. त्यामुळे या वर्षी त्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पारंपारिक शेती सोडून मागच्या काही वर्षापासून फळबाग लागवडीला प्राधान्य दिले आहे. त्यामध्ये यांनी पहिल्यांदा डाळिंबाची लागवड केली मात्र डाळिंबावर पडणाऱ्या मर रोगामुळे त्यांचे डाळिंब पीक वायाला गेले आणि त्यांनी संपूर्ण डाळिंब काढून टाकले आणि त्यानंतर पेरूची लागवड केली.

मात्र सध्या पेरू लागवडीतून देखील त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. पेरूची बाग लावल्यानंतर दीड वर्षानंतर उत्पादनाला सुरुवात झाली. पहिल्या वर्षी त्यांनी 12 टन उत्पादन घेतले. आणि त्यांना जवळपास सात ते आठ लाख रुपयांचा नफा मिळाला. त्यानंतर दुसऱ्या वर्षी देखील त्यांनी 30 टन उत्पादन घेतले. असून त्यांना दहा ते बारा लाख रुपयांचा नफा मिळाला मात्र यावर्षी पाऊस नसल्याने चव्हाण यांना 60 ते 70 टन उत्पादनाची अपेक्षा होती मात्र आता 40 टन उत्पादन मिळणार आहे. यावेळी कमी उत्पादन मिळाल्यामुळे त्यांना जवळपास चार ते पाच लाखांचा तोटा होणार असल्याचा बोलले जात आहे.

बातमी शेअर करा
#Frustration
Comments (0)
Add Comment