दिवाळीनंतर होणार शासकीय कापूस खरेदीला प्रारंभ !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | ३ नोव्हेबर २०२३

राज्यातील अनेक शेतकऱ्याकडे मोठ्या प्रमाणात कापूस आहे पण दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर शासकीय कापूस खरेदी सुरू होत असते मात्र यंदा दिवाळीनंतर शासकीय कापूस खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे. पणन महासंघाच्या कापूस खरेदीचा प्रश्‍न अद्याप अंधातरी असून, ‘सीसीआय’ सहा केंद्रांवर खरेदी करणार आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर कापसाची लागवड होते. मात्र दरवर्षी कापूस खरेदीचा प्रश्‍न गुतांगुतीचा होतो. सद्यःस्थितीत कापसाचे दर हमीभावापेक्षा खाली आले आहेत.
दरात सुधारणा होण्यासाठी शासकीय कापूस खरेदी केंद्र अत्यंत गरजेचे आहे. असे असताना अजूनही शासकीय कापूस खरेदी सुरू झालेली नाही. यंदा संततधार पाऊस, गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव अशा अनेक कारणांमुळे कापसाची उत्पादकता घटण्याचा अंदाज आहे. गेल्या हंगामात खुल्या बाजारातील कापसाचे दर हमीभावापेक्षा अधिक होते.

यंदा सुरुवातीला कापसाचे दर घसरले आहेत. खासगी बाजारातील दर पाहता शासकीय कापूस केंद्र सुरू होणे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. मात्र, अजूनही शासकीय कापूस खरेदीचा मुहूर्त ठरलेला नाही. सीसीआयने हमी न घेतल्याने गेल्या वर्षी पणन महासंघाने केंद्र सुरू केले नव्हते. यंदाही पणन केंद्र सुरू होण्याबाबत साशंकता आहे. सीसीआयने केंद्र सुरू करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. सीसीआय जिल्हात यंदा सहा कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याच्या तयारीत आहे. गेल्या हंगामात ‘सीसीआय’ने देखील खुल्या बाजारातून कापूस खरेदीचे नियोजन केले होते. मात्र त्यानंतर माशी कुठे शिंकली, हे अद्याप समोर आलेले नाही.

बातमी शेअर करा
#cottoun
Comments (0)
Add Comment