देशात टोमॅटोची आयात ; पहा काय आहे दर !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १४ ऑगस्ट २०२३ | देशभर टोमॅटोचे भाव चांगलेच वाढलेले असून या दरात चढउतार जरी होत असली तरी टोमॅटोच्या दर वाढलेलेच पाहायला मिळत आहेत. पहिल्यादा टोमॅटोच्या दराने शंभरी गाठल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फायदा झाला आहे.पण केंद्र सरकारने नेपाळहून टोमॅटोची आयात करण्याचा निर्णय घेतल्यापासून टोमॅटोचे देशातील दर कमी झाले आहेत.

नाशिकच्या बाजार समितीत टोमॅटोचे दर निम्म्यावर आलेत. २० किलो कॅरेटचा (२० किलो) दर आधी २ हजार २०० रुपये होता. पण आता तोच दर १ हजार १०० ते १ हजार २०० रुपयांवर आला आहे. त्यामुळे सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने नेपाळहून टोमॅटो आयातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नेपाळहून उत्तर भारतात टोमॅटोची आयात सुरु झाली आहे. तसंच या आयातीमुळे भाव पडल्याची खंत देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. तर मागील काही दिवसांपूर्वी टोमॅटोचे किलोचे दर जवळपास २०० रुपये किलोवर पोहचले होते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरातून टोमॅटो गायब झाला होता.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान पाहायला मिळत होतं. परराज्यात किरकोळ बाजारात ग्राहकांना २०० ते २५० रुपये किलो खरेदीने टोमॅटो करावा लागत होता. दर वाढ झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळत होता. परंतु केंद्र सरकारने टोमॅटो आयातीचा निर्णय घेतला आणि दरात घसरण झाली असल्याचं नाशिकमधील शेतकरी सांगतात.

बातमी शेअर करा
#tomatoes
Comments (0)
Add Comment