कृषी सेवक । २६ जानेवारी २०२३ । देशासह राज्यातील काही भागात जोरदार थंडी वाढू लागत असतानाचा काही भागात रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह औरंगाबाद आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्यासह विजेचा कडकडाट देखील पाहायला मिळाला.
ज्यामुळे रब्बीच्या पीकांना मोठा फटका बसला आहे. तोंडघशी आलेला गव्हाचे मोठं नुकसान झाले आहे. या पावसामुळे गव्हाच्या पीकांना सर्वाधिक फटका बसला आहे.औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी गव्हाचे पीक आडवे पडली आहेत. प्लॉटचे प्लॉट आडवे झाल्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहे. तर नुकसानाचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. ज्यात औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा आणि सावखेडा परिसरात गव्हाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. तर पैठण तालुक्यातील नांदलागाव शिवारातील शेतकरी रशीद शहा यांच्या गट नंबर 161 मधील शेतातील गव्हाच्या पिकाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत.