कृषी सेवक I २८ डिसेंबर २०२२ Iदेशातील बाजारात सोमवारी कापूस दरात मोठी घट झाल्यानंतर मंगळवारी दर स्थिरावले होते. मात्र आज काही बाजारांमध्ये कापूस दरात वाढ झालेली दिसली.
कापसाचे दर तुटल्यानंतर शेतकऱ्यांनी बाजारातील आवक कमी केली. तसेच वायद्यांमध्ये कापूस दर वाढल्याने बाजार समित्यांमधील दरातही सुधारणा पाहायला मिळाली. कापसाला सरासरी ७ हजार ६०० ते ८ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. जानेवारीत कापसाचे दर वाढू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.