टोमॅटोच्या दरात भरमसाठ वाढ ; केद्राने घेतला निर्णय !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | ११ ऑगस्ट २०२३| देशभरात मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड कमी झाल्याने दरात भरमसाठ वाढ झाली असून सध्या बाजारात १५० ते २०० रुपये प्रतिकिलोनं टोमॅटोची विक्री सुरु असून त्यामुळं या वाढत्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं नेपाळमधून टोमॅटोची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली. आज नेपाळमधून भारतात टोमॅटोचा पहिला लॉट दाखल होणार आहे.

देशात टोमॅटोच्या दरात विक्रमी वाढ होत असल्याचे अर्तमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या. त्यामुळं भारत आता नेपाळमधून टोमॅटो आयात करणार असल्याची माहिती सीतारामण यांनी लोकसभेत दिली. टोमॅटोचो आयातीचा पहिला लॉट आज उत्तर भारतातील वाराणसी, लखनौ आणि कानपूर शहरात पोहोचण्याची शक्यता असल्याचे त्या म्हणाल्या. घाऊक बाजारात टोमॅटोच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांत टोमॅटोच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सध्या 150 ते 200 रुपये किलो दरानं टोमॅटोची विक्री केली जात आहे.

दरम्यान, अवकाळी पाऊस, जास्त तापमान आणि पिकावर झालेला विषाणूंचा प्रादुर्भाव याचा टोमॅटोवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळं अनेक ठिकाणी टोमॅटोचे पिक वाया गेले आहे. त्यामुळं टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. पिकाचं नुकसान झाल्यामुळं बाजारात कांद्याचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळं दरात वाढ होताना दिसत आहे. मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला याचा परिणाम दरांवर झाला आहे.

बातमी शेअर करा
#centergoverment#tomato
Comments (0)
Add Comment