राज्यातील मान्सूनचा पाऊस किती?
महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाने सर्व जिल्ह्यांत हजेरी लावली आहे. मात्र, १५ जूननंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या. मागील चार दिवसांत पावसाचा जोर वाढल्याने उर्वरित क्षेत्रांवरील पेरण्यांना दिलासा मिळाला आहे.
राज्यातील पावसाची सरासरी आणि आकडेवारी
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा १०१ टक्के पाऊस पडला आहे. आजपर्यंतची सरासरी १८७ मिमी असताना, सध्या १८९ मिमी पाऊस पडला आहे. कोकणात सर्वाधिक ५०१ मिमी पाऊस झाला आहे.
विभागनिहाय पावसाचे आकडे
– नाशिक विभाग: १४१ मिमी
– पुणे विभाग: १९५ मिमी
– छत्रपती संभाजीनगर विभाग: १७२ मिमी
– अमरावती विभाग: १३६ मिमी
– नागपूर विभाग: ९३ मिमी (सर्वांत कमी)
कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला
कृषी विभागाने ज्या भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे, त्या भागातील शेतकऱ्यांना पेरण्यांची घाई करू नये असा सल्ला दिला आहे..