मान्सून अपडेट: लवकरच महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता

बातमी शेअर करा

शेतकरी आणि नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. सर्वांनाच ज्याची आतुरतेने प्रतीक्षा होती, तो मान्सून अखेर केरळ आणि ईशान्य भारतात गुरुवारी, म्हणजेच ३० मे रोजी, अंदाजाच्या एक दिवस आधीच दाखल झाला आहे. हवामान खात्याच्या मते, मान्सून वेगाने पुढे सरकत असून, लवकरच महाराष्ट्रातही पोहोचेल.

गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे राज्यात दुष्काळाचे सावट आहे. यामुळे पावसाची सर्वत्र प्रतीक्षा लागली आहे. काही दिवसांपासून देशभरात तापमानात वाढ झाली आहे, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हामुळे नागरिकांची स्थिती बिकट झाली आहे. मात्र, पुढील आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळेल.

यंदा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

दरवर्षी मान्सून केरळमध्ये १ जून रोजी दाखल होतो, पण यंदा तो दोन दिवस आधीच आला आहे. यापूर्वी, मान्सून अंदमान निकोबारमध्ये १९ मे रोजीच दाखल झाला होता. हवामान खात्याने यंदा देशभरात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

मान्सूनची लवकरात लवकर महाराष्ट्रात आगमन होऊन शेतकऱ्यांचे संकट दूर व्हावे, अशीच सर्वांची अपेक्षा आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment