सोयाबीन बाजारात बदल नाही

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १८ डिसेंबर २०२२ I आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोयाबीनचा बाजार वाढीसह बंद झाला होता. शुक्रवारी सोयाबीनचे वायदे १४.८० डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. मात्र देशातील सोयाबीन बाजार सुस्तच होता. सोयाबीनच्या दरात फारसा बदल दिसला नाही. तर दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी बाजारातील आवक कमी केली आहे. सोयाबीन दरात जानेवारी महिन्यात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment