सोलापुरात उद्या ऊस दराबाबत बैठक

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३० ऑक्टोबर २०२२ | ऊसदर संघर्ष समितीने गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात आंदोलनाची धार तीव्र केली असून उसाला पहिली उचल २५०० रुपये आणि ऊसदर ३१०० रुपये देण्याच्या मागणी करण्यात आली होती सोमवारी (ता. ३१) ऊसदर संघर्ष समिती आणि कारखान्याचे कार्यकारी संचालक, व्यवस्थापक यांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली आहे.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली सात रस्ता येथील नियोजन भवनमध्ये सोमवारी सकाळी दहा वाजता ही बैठक होईल. या बैठकीसाठी जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी कारखानदार, ऊसदर संघर्ष समितीसह शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना ऊसदरावर एकत्र आल्या आहेत. उसाला पहिली उचल २५०० रुपये द्यावी, या मागणीसाठी ऊसदर संघर्ष समितीने आंदोलन तीव्र केले आहे. कारखानदारांनी स्वतःहून हा दर जाहीर करावा आणि मगच ऊसतोड सुरु करावी, अशी मागणी समितीने केली. दिवाळीमध्ये आधी गांधीगिरीने आंदोलन झाले.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment