पाचोरा येथे बळीराजा गौरवदिनी शेतकऱ्यांचा सत्कार

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २७ ऑक्टोबर २०२२ | पाचोरा येथे बळीराजा गौरवदिनानिमित्त दि. २६ रोजी शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

शहरातील पांचाळेश्वर नगर, येथे २६ रोजी सायंकाळी ७ वाजता बळीराजा गौरवदिनाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आ. किशोर पाटील तर उद्घाटक नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक धनराज पाटील हे होते . तसेच प्रमुख पाहुणे म्हणून निर्मल सीड्सच्या संचालिका वैशाली सुर्यवंशी, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, शरद पाटे, मच्छिंद्र जाधव, सुनिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विकास पाटील, डॉ. स्वप्नील पाटील, पप्पू राजपूत, नितीन तावडे, स्नेहा कदम, निकिता पाटील, गायत्री मराठे, डॉ. योगेश पाटील, जिभू पाटील, सुनिल शिंदे, भूषण वाघ सह मान्यवर उपस्थित होते. यावेळी शेतकरी बांधव स्वप्निल विठ्ठल निकम, विश्वास आनंदा पाटील, तुकाराम तेली, मयूर जगदीश शेलार, संदीप बाबुलाल मोराणकर, आबा दोधु भाई, संजय तुकाराम परदेशी, लक्ष्मण सुरेश चांगरे, सुनिल अशोक महाजन, अब्दुल रशीद देशमुख, माधव शामराव वाघ, अशोक महादू मोरे, बारकू बाळू पवार, या शेतकऱ्यांचा गौरव करत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी आमदार किशोर पाटील यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधव सहकुटुंब उपस्थित होते. आयोजन रवींद्र पाटील, राजेंद्र पाटील, अनिल मराठे, संदीपराजे पाटील, रोहिदास पाटील, मच्छिंद्र पाटील, दादा जगताप, शुभम चव्हाण, परमेश्वर मराठे, भैय्या मिस्तरी, कल्पेश शिंपी, मुकेश पाटील, पुंडलिक चव्हाण, सौरभ चंद्रात्रे, वसंत जगताप, सुकलाल जगताप, दर्शन पाटील, अनिल पाटील, प्रदीप वाघ, नितीन पाटील, बबलू तांबे, सचिन पाटील शरद पाटील, गणेश काळे, दीपक गायकवाड आदि पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एस. ए. पाटील यांनी तर आभार भूषण पाटील यांनी मानले.

बातमी शेअर करा
#pachora #shetkari #baliraja
Comments (0)
Add Comment