कांदा बाजारभाव स्थिरच

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १७ डिसेंबर २०२२ I  कांद्याचे दर अद्यापही दबावात आहेत. बाजारात आवक वाढल्यानं दर नरमल्याचं व्यापारी सांगतात. सध्या कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल १ हजार २०० ते १ हजार ७०० रुपये दर मिळतोय. खरं तर यंदा राज्यात कांद्याची लागवड कमी होती, असं शेतकरी सांगत होते.

त्यामुळं बाजारात पुरवठा मर्यादीत होऊन दर सुधारण्याचा अंदाज होता. मात्र सध्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत आहे. पण पुढील काळात कांदा दरात सुधारणा होऊ शकते, असे जाणकारांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment