२.१४ लाख टन साखरेची अदलाबदल करण्याची परवानगी

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ३ डिसेंबर २०२२ I केंद्र सरकारने साखर कारखान्यांना निर्यातीसाठीच्या कोट्यातील २.१४ लाख टन साखरेची अदलाबदल करण्याची परवानगी दिली आहे.

 

१७ साखर कारखान्यांनी तशी मागणी केली होती. या कारखान्यांना एकत्रितपणे २.८८ लाख टन साखर कोटा मंजूर करण्यात आला होता. अन्न मंत्रालयाने याआधी २.३८ लाख कोट्याची अदलाबदल करण्याची परवानगी दिली होती. बिहार आणि उत्तर प्रदेशातील अनेक साखर कारखान्यांनी महाराष्ट्रातील कारखान्यांबरोबर साखर कोटा अदलाबदलीसाठी करार केले होते. महाराष्ट्रात बंदरे असल्याने निर्यातीसाठी अधिक वाव आहे. केंद्र सरकारने ३१ मे रोजी यंदाच्या वर्षासाठी ६० लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली होती. त्यासाठी कोटा पध्दत लागू करण्यात आली.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment