कृषी सेवक | १६ ऑक्टोबर २०२२ | पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ ऑक्टोबर रोजी मेळा ग्राउंड, IARI पुसा, नवी दिल्ली येथे सकाळी १२ वाजता “पीएम किसान सन्मान संमेलन २०२२” या दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन करणार असून या कार्यक्रमाला शेतकरी आणि कृषी स्टार्टअप्स, संशोधक, धोरण निर्माते, यांना आमंत्रित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी बँकर्स आणि इतर भागधारकांना संबोधित करणार आहेत.
या कार्यक्रमात देशभरातील १३,५०० शेतकरी आणि १५०० कृषी स्टार्टअप एकत्र येतील. ७०० कृषी विज्ञान केंद्रे,७५ ICAR संस्था, ७५ राज्य कृषी विद्यापीठे, ६०० पीएम किसान केंद्रे,५०,०००प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि 2 लाख सामुदायिक सेवा केंद्रे (एससीसी) विविध संस्थांमधून १ कोटीहून अधिक शेतकरी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
या उद्घाटन सोहळ्याला कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि भारत सरकारचे रसायन आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया उपस्थित राहून शेतकऱ्यांना संबोधित करतील. कैलाश चौधरी, राज्यमंत्री, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, शोभा करंदलाजे, राज्यमंत्री, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि भगवंत खुबा, राज्यमंत्री, रसायन आणि खते मंत्रालय, भारत सरकार हे देखील उपस्थित राहणार आहेत.