कृषी सेवक | १९ ऑक्टोबर २०२२ | पाचोरा व भडगाव तालुक्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहिर करुन सरसकट पंचानामे करण्यात यावे तसेच दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. अशा थ मागण्यांचे निवेदन उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना नेत्या वैशाली नरेंद्रसिंह सुर्यवंशी, जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपुत, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख रमेश बाफना, तालुका प्रमुख शरद पाटील, नगरसेवक दत्ता जडे, दादाभाऊ चौधरी, व्यापारी सेनेचे आनंद संघवी, युवासेना उपजिल्हा युवाधिकारी संदिप जैन, शहर प्रमुख दिपक पाटील, तालुका संघटक हिलाल पाटील, भरत खंडेलवाल, अमरसिंग पाटील, प्रताप मोगरे, पप्पु जाधव, हरिष देवरे, नाना वाघ सह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.