कृषी सेवक | २८ ऑक्टोबर २०२२ |राज्यातील बाजारात सध्या हळदीचे दर कमी आहेत. मागील वर्षापासून हळदीला बाजारात कमी दर मिळत आहे. कोरोनानंतर निर्यातही घटली. परिणामी हळदीला उठाव कमी राहून दर आवाक्याखाली आले. तसंच सध्या बाजारातील आवकही कमी आहे. मात्र प्रक्रिया उद्योगाकडून मागणी कमी आहे. त्यामुळे हळदीला कमी उठाव असल्याने सध्या हळदीला सरासरी प्रतिक्विंटल ५ हजार ५०० ते ७ हजार रुपये दर मिळत आहे. ही दरपातळी पुढील काही महिने कायम राहू शकते, असा अंदाज हळद बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.