सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १० डिसेंबर २०२२ I आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरातील सुधारणा आजही कायम होती. आज सोयाबीन दराने मागील तीन महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठली. सोयाबीनचे वायदे १४.८७ डाॅलर प्रतिपाऊंडवर पोचले होते. तर देशातील बाजारातही सोयाबीनचे दर क्विंटलमागे सरासरी ५० ते १०० रुपयाने सुधारले होते. आज सोयाबीनला सरासरी ५ हजार २५० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरासोबत देशातील दरही सुधारू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment