८० लाख हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ३ डिसेंबर २०२२ I मागील हंगामातील हरभऱ्याला अद्यापही दर कमी मिळत आहे. गेल्या हंगामात सरकारने हरभऱ्यासाठी ५ हजार २३० रुपये हमीभाव जाहीर केला होता. मात्र बाजारात सध्या हरभऱ्याला ४ हजार ४०० ते ४ हजार ९०० रुपये दर मिळत आहे.

त्यामुळे शेतकरी हरभऱ्याचा पेरा कमी करतील, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र आत्तापर्यंत देशात जवळपास ८० लाख हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाला. गेल्यावर्षीपेक्षा हा पेरा ४ लाख हेक्टरने जास्त आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment