कृषी सेवक | २० नोव्हेंबर २०२२ | यंदा देशातील प्रमुख गहू उत्पादक राज्यांत गव्हाची पेरणी नेहमीपेक्षा लवकर सुरू झाली. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडील १८ नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार सुमारे १०१ लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झालीय.
गेल्या वर्षीच्या तुलनेत गव्हाचा पेरा १५ टक्क्यांनी वाढलाय. गव्हाचा सर्वाधिक पेरा पंजाबमध्ये झालाय. त्यानंतर राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात यांचा क्रमांक लागतो. रब्बी अन्नधान्य पिकांमध्ये एकट्या गव्हाचा वाटा ७० टक्के आहे.
यंदा गव्हाचं क्षेत्र जास्त राहील. परंतु पंजाब, राजस्थान आणि मध्य प्रदेशात खतांचा तुटवडा असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.