कृषी सेवक | २६ नोव्हेंबर २०२२ |यंदा सोयाबीनचा बाजार थंड असल्याचे अमरावती येथे जिल्ह्यात असून अजूनही भाव सहा हजारांवर जाऊ शकलेले नाहीत. गतवर्षी दहा हजार रुपयांचा पल्ला पार करणारे सोयाबीन यंदा मात्र साडेपाच हजाराच्या आसपासच अडकले आहेत.
केंद्राने डीओसी व पाम तेल आयात करण्याच्या धोरणाचा फटका सोयाबीनच्या स्थानिक बाजारात बसू लागला असून, जिल्ह्यात या वर्षी अडीच लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होती. पीक कापणीच्या प्रयोगात जिल्ह्याची उत्पादनाची सरासरी हेक्टरी सात क्विंटल इतकी खाली आली आहे. त्यामुळे या वर्षी साडेतीन ते पावणेचार लाख क्विंटल सोयाबीन जिल्ह्यात होण्याचा अंदाज आहे. बाजार समितीमध्ये आवक अजूनही दहा हजार क्विंटलच्या वर जाऊ शकली नसून मंगळवारी (ता. २२) ती ८,७८३ पोत्यांची होती. लिलावात सोयाबीनला ४,५२१ ते ५,५६० रुपये प्रति क्विंटल मिळाला. तर बियाण्यांच्या सोयाबीनला ५,६०० ते ५,९५० रुपये भाव मिळाला. सोयाबीनला सहा हजार रुपयांवर भाव येथील बाजारात मिळू शकलेला नाही.