कृषी सेवक I २२ डिसेंबर २०२२ I देशातील सोयाबीन बाजार आजही स्थिर होता. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर वाढून १४.८३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले. सोयातेल आणि सोयापेंडच्या दरातही सुधारणा पाहायला मिळाली.
मात्र देशातील बाजारात आज सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. सध्यातरी सोयाबीन या दरपातळीवर राहील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.